मंडळ परिचय
स्थापना : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली सात शाळकरी विद्यार्थ्यांनी केली.
दृष्टिकोन : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा व्यापक विचार संस्थेने अंगिकारला आहे.
ध्येयधोरण : सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे.
कार्यक्षेत्र : मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणारया चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
सदस्यत्व : इयत्ता ५ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास संस्थेचा सभासद होता येते. केवळ एक रुपयात आजीव सभासदत्व देणारी ही एकमेव संस्था. कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यास सभासद होण्याची मुभा आहे.
सदस्य परिवार : आजमितीस संस्थेचे १४,००० हून अधिक सभासद आहेत. यापैकी अनेक जण पदवीधर, उच्चशिक्षित असून डॉक्टर, प्राध्यापक, वकील अभियंते, पत्रकार, कला वा क्रीडा इत्यादि क्षेत्रात कार्यरत आहेत.
अधिक...
आगामी कार्यक्रम
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित हीरक महोत्सवी विवेकानंद व्याख्यानमाला २०१७

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित हीरक महोत्सवी विवेकानंद व्याख्यानमाला २०१७ वक्ते आणि विषय यादी: मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर २०१७, वक्ते: ले. जनरल दत्तात्रय शेकटकर विषय: सरंक्षण नीती आणि भारताचे शेजारी बुधवार, दि. २९ नोव्हेंबर २०१७, वक्ते: डॉ. मंजुषा कुलकर्णी विषय: विवेकानंदांच्या विचारातील भारत आणि आजचा तरुण गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७, वक्ते: डॉ. जयंत नारळीकर विषय: वेध अंतराळाचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०१७, वक्ते: अनिल बोकील विषय: अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि सामान्य माणूस शनिवार, दि. २ डिसेंबर २०१७, वक्ते: डॉ. अविनाश पोळ विषय: पाणी: समस्या आणि उपाय रविवार, दि. ३ डिसेंबर २०१७, वक्ते: डॉ. विनय सहस्त्रबुद्धे विषय: सुशासन, विकास आणि लोकसहभाग वेळ: दररोज सायं. ८.३० वा. स्थळ:- छ्त्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा मैदान), लालबाग, मुंबई - १२
___________________________________

माहिती पट